पावसाळ्यात बाहेर पाऊस पडत असताना सर्वांनाच कांदा भजी खावीशी वाटतात चला तर मग आपण आज कमी तेलकट आणि ते सुद्धा पाण्याचा वापर न करता भजी कशी बनवायची ते पाहूया
साहित्य:
उभी पातळ कापलेले कांदे ५-६
ओवा १/२ चमचा
मीठ चवीनुसार
बेसन १ कप
तांदूळ पीठ २ चमचे
मिरची पावडर १ चमचा
तळण्यासाठी तेल
कृती:
प्रथम कांदे उभे पातळ कापून घ्यावे व त्यावर मीठ टाकून कांदा चोळून घ्यावा म्हणजे कांदा पूर्णपणे मोकळा मोकळा होतो व आपल्याला भजी टाकणे सोपे होते
मीठ कांद्याला चोळल्यानंतर कांदा झाकून दहा मिनिटांसाठी तसेच ठेवून द्यावा म्हणजे त्याला पाणी सुटेल व आपल्याला जास्तीचे पाणी घालण्याची गरज भासणार नाही
दहा मिनिटानंतर कांद्यात ओवा ,मिरची पावडर, तांदळाचे पीठ व बेसन घालून मिक्स करून घ्यावे
कांद्याला जेवढं पाणी सुटले आहे त्यात जेवढे मावेल तेवढेच बेसन घालावे जास्त बेसन घातले तर भजे दाटल्यासारखे होतात
भजी तळण्यासाठी कढईत तेल गरम होण्यासाठी ठेवावे तेल चांगले गरम झाल्यावर कडकडीत मोहन भजीच्या मिश्रणात घालून मिक्स करावे गरम तेलात भजी टाकून भाजून घ्यावे बारीक गॅसवर भजी भाजू नयेत नाहीतर भजी तेलकट होतात भजी तळण्यासाठी मिडीयम गॅसवर भाजावेत
अशाप्रकारे गरमागरम भजी खाण्यासाठी तयार आहेत

Comments
Post a Comment