आज आपण आलू पराठा कसा बनवायचा ते पाहूया
साहित्य :
कणीक भिजवण्यासाठी लागणारे साहित्य:
गव्हाचे पीठ २ कप
बेसन ४ चमचे
तेल २ चमचे
मीठ चवीनुसार
पाणी
सारणासाठी लागणारे साहित्य:
उकडलेले बटाटे ५
हिरवी मिरची ४
कोथिंबीर १/२ कप
आले १ इंच
कसुरी मेथी १ चमचा
धने पावडर १ चमचा
गरम मसाला १/२ चमचा
मिरची पावडर १/२ चमचा
जिरे १/२ चमचा
आमचूर पावडर १ चमचा
हिंग १/४ चमचा
मीठ चवीनुसार
कृती:
सर्वप्रथम एका भांड्यात गव्हाचे पीठ ,बेसन, तेल ,मीठ हे सर्व पदार्थ एकत्र करून त्यात थोडे थोडे पाणी घालून व्यवस्थित मळून घ्यावे मळून झाल्यानंतर कणके वरती थोडंसं तेल लावून कनिक भिजण्यासाठी पंधरा मिनिटे ठेवून द्यावी
सारण तयार करण्यासाठी उकडलेले बटाटे किसणीने किसून घ्यावे किसलेल्या बटाट्यात कुटून घेतलेलं हिरवी मिरची आणि आलं घाला नंतर त्यात कसुरी मेथी ,कोथिंबीर, गरम मसाला, हिंग ,आमचूर पावडर, मिरची पावडर, धने पावडर ,जिरे, चवीपुरते मीठ घालून मिक्स करून घ्यावे
त्यानंतर कणकेचा एक गोळा घेऊन त्यात तयार केलेले सारण भरावे व पराठा लाटावा
पराठा लाटल्यानंतर गरम झालेल्या तव्यावर तेल किंवा तूप सोडून पराठा व्यवस्थित भाजून घ्यावा
अशा प्रकारे गरमागरम पराठे खाण्यासाठी तयार आहेत

Comments
Post a Comment