कुरकुरीत अळूवडी

 कुरकुरीत अळूवडी


साहित्य

१ चिंच २ मोठे चमचे 

२ गुळ २ चमचे 

वाटण:

१ कोथिंबीर १/४ कप 

२ हिरवी मिरची ३-४

३ लसूण पाकळ्या १५-२०

४ आलं १इंच 


१ अळूची पाने १०

२ बेसन १/२ कप

३ तांदळाचे पीठ १/४ कप 

४ पांढरे तीळ २ चमचे 

५ भाजलेले जिरेपूड १ चमचा

६ मीठ चवीनुसार

७ हळद १/२ चमचा

८ मिरची पावडर १/२ चमचा 

९ ओल्या नारळाचा चव १/४ कप

१० चिंच गुळाचे पाणी 

११ तयार वाटण

१२ तळण्यासाठी तेल

कृती:

प्रथम अळूची पाने स्वच्छ धुऊन पुसून घ्यावी

एका भांड्यात बेसन ,तांदळाचे पीठ, तीळ ,जिरेपूड ,वाटण, चवीनुसार मीठ, हळद ,लाल तिखट ,नारळाचा चव ,चिंचगुळाचे पाणी, हे सर्व पदार्थ मिक्स करून थोडे थोडे पाणी घालून मिश्रण सरसरीत भिजवून घ्या 

अळूचे एक पान घेऊन पानाच्या पालथ्या बाजूला तयार झालेले मिश्रण एकसारखे पसरून लावून घ्यावे व त्यावर दुसरे पान विरुद्ध दिशेने ठेवून त्या पानालाही मिश्रण लावावे असे एकावर एक तीन अळूची पाने ठेवून त्यावर मिश्रण लावा

मिश्रण लावून झाल्यानंतर पानांचा रोल करावा व स्टीमर मध्ये तयार झालेले सगळे रोल १५ मिनिटांसाठी वाफवून घ्यावे 

वाफवून घेतलेले रोल थंड झाल्यावर त्याचे एक सेंटीमीटर अशा आकाराचे काप करून घ्यावे व ते काप गरम तेलामधून तळून घ्यावे 

अशा प्रकारे आपली कुरकुरीत अळूवडी तयार होते

Comments

Post a Comment