ढोकळा

 ढोकळा हा भारतातील गुजरात प्रांतातील पदार्थ आहे. हा पदार्थ गुजरात प्रांतातील असला तरी सध्या वेगवेगळ्या ठिकाणी लोकप्रिय स्ट्रीट फूड म्हणून सहजरीत्या मिळतो. ढोकळा हा पदार्थ मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा पदार्थ आहे हा पदार्थ आपण नाश्ता म्हणून पण खाऊ शकतो, जेवणासोबत पण खाऊ शकतो आणि संध्याकाळी चहा सोबत पण खाऊ शकतो. आज-काल छोट्या छोट्या पार्टीमध्ये ढोकळा हा पदार्थ आवर्जून असतो कारण तो बनवायला सोपा आणि पचायला पण सोपा असा पदार्थ आहे. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत ढोकळा हा पदार्थ सर्वांचा आवडीचा आहे



साहित्य:

ढोकळ्याचे मिश्रण बनवण्यासाठी चे साहित्य:

बेसन १ कप

बारीक रवा २ चमचे

मीठ चवीनुसार

साखर २ चमचे

 इनो १ चमचा

दही १/२ कप

 तेल २ चमचे

बारीक चिरलेली हिरवी मिरची १ चमचा

हळद चिमूटभर

लिंबाचा रस १ चमचा

पाणी आवश्यकतेनुसार

फोडणीसाठी साहित्य:

तेल १ चमचा

हिरवी मिरची ४-५

कढीपत्ता

मोहरी १ चमचा

पाणी 

साखर २-३ चमचे

मीठ चवीनुसार

कृती:

प्रथम एका भांड्यात बेसन घेऊन त्यात दोन चमचे रवा ,अर्धा कप आंबट दही ,साखर, मीठ, तेल ,बारीक चिरलेली हिरवी मिरची, चिमूटभर हळद (हळद किंचित घाला हळद जास्त झाली तर ढोकळ्याचा कलर बिघडतो) हे सर्व पदार्थ एकत्र करून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून त्याचे मिश्रण तयार करून घ्या.

मिश्रण झाकून दहा मिनिटांसाठी तसेच ठेवून द्या.

तोपर्यंत एका स्टीमर मध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवा.

एका स्टीलच्या डब्याला आतून तेल लावून घ्यावे.

दहा मिनिटानंतर मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यावे व त्यात इनो टाकून मिश्रण मिक्स करावे नंतर स्टीलच्या डब्याला तेल लावून घेतले होते त्यात हे सर्व मिश्रण ओतावे व गरम होण्यासाठी ठेवलेल्या स्टीमर मध्ये मिश्रणाचा डब्बा ठेवावा स्टीमर वर झाकण ठेवून १५मिनिटांसाठी शिजण्यासाठी ठेवावा.

१५मिनिटांनंतर चाकूच्या साह्याने ढोकळा शिजला आहे का ते बघावे.

ढोकळा तयार झाल्यावर थंड होण्यासाठी ठेवावा.

तोपर्यंत आपण फोडणी करू

एका पॅन मध्ये तेल घ्या तेल गरम झाल की त्यात मोहरी , चिर दिलेली हिरवी मिरची ,कडीपत्ता घाला नंतर त्यात १/२कप पाणी घाला साखर चवीनुसार मीठ घालून उकळून घ्या. 

ढोकळा थंड झाल्यावर तो डब्यातून काडून त्याचे तुकडे करा नंतर त्यात तयार केलेली फोडणी घाला.

अश्याप्रकरे ढोकळा खाण्यासाठी तयार आहे.

Comments