मिसळ

 महाराष्ट्रीयन मिसळ पाव हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. मिसळ म्हणलं की कोणाच्या तोंडाला पाणी सुटत नाही बाहेर आपण बऱ्याचदा मिसळ खातो त्याचा स्वाद आपल्याला घरी ही तितकाच उत्कृष्टपणे आणता येतो. मिसळ म्हणजे अनेक पदार्थांचे मिश्रण म्हणून या पदार्थाला मिसळ असे नाव देण्यात आले आहे. मिसळ म्हणजे अगदी महाराष्ट्रीयन फक्कड पदार्थ चला तर मग आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने मिसळ कशी बनवायची ते पाहूया 

मिसळ 

साहित्य: 

(१० लोकांचे प्रमाण)

मटकी शिजवण्यासाठी:

२ कप मोड आलेली मटकी 

१/४  चमचा हळद

मीठ चवीनुसार

४ कप पाणी

मिसळ चे वाटण बनवण्यासाठी चे साहित्य: 

१/२ कप सुके खोबरं 

१ चमचा धने 

१५-१६ पाकळ्या लसूण 

१ इंच आलं

२ कांदे 

१चमचा जिरे 

१ इंच दालचिनी

२-३हिरवी वेलची 

१ मसाला वेलची 

३-४ लवंग

१ चमचा पांढरे तीळ 

१ चमचा काळी मिरी 

२ चमचे तेल 

मिसळचा कट / तर्री बनवण्यासाठी चे साहित्य:

 कढीपत्ता

 ७-८ मोठे चमचे तेल

 १/२ चमचा हळद

 १ चमचा मोहरी 

 १ चमचा धनेपूड 

३ चमचे कांदा लसूण मसाला 

१ चमचा बेडगी मिरची पावडर

 मीठ चवीनुसार

१ कप बारीक चिरलेला कांदा 

१/२ कप बारीक चिरलेला टोमॅटो 

तयार वाटण

सुकी मटकी बनवण्यासाठी चे साहित्य:

२ चमचे तेल 

७-८ कढीपत्ता

१/२ चमचा मोहरी 

१/४हळद 

१/२ चमचा मिरची पावडर

१ चमचा कांदा लसूण मसाला 

बारीक चिरलेली कोथिंबीर

 शिजवलेली मटकी 

 मीठ चवीनुसार

कृती :

प्रथम मोड आलेली मटकी, पाणी, हळद आणि मीठ कुकरमध्ये घालून एक शिट्टी काढून घ्या

नंतर एका पॅनमध्ये धने, जिरे ,लवंग ,दालचिनी ,मिरे ,पांढरे तीळ, हिरवी वेलची, मसाला वेलची, खोबरे हे सर्व मसाले मध्यम आचेवर भाजून घ्या 

नंतर एका पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकून त्यावर दोन कांदे भाजून घ्यावे भाजलेला कांदा थंड झाल्यावर त्यात भाजून घेतलेले मसाले आणि लसूण आलं घालून त्याचं मिक्सरमध्ये वाटण करून घ्या

तर्री बनवण्यासाठी एक मोठी कढई गॅसवर गरम होण्यासाठी ठेवा त्यात सात आठ मोठे चमचे तेल टाका तेल गरम झालं की त्यात मोहरी कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला कांदा घालून परतून घ्या 

नंतर त्यात टोमॅटो घालून परतून घ्या टोमॅटो परतल्यानंतर हळद, धनेपूड, मिरची पावडर, कांदा लसूण मसाला घालून व्यवस्थित परतून घ्या नंतर त्यात तयार केलेले वाटण घालून तेल सुटेपर्यंत परता

वाटण परतल्यानंतर त्यात गरम पाणी घाला व चवीनुसार मीठ घाला  व तर्री मध्यम आचेवर उकळून घ्या

आता आपण सुकी मटकी बनवून घेऊया सुकी मटकी बनवण्यासाठी एका कढईत दोन चमचे तेल टाकून त्यात मोहरी, हळद ,कढीपत्ता, मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, घालून परतून घ्या त्यात शिजवलेली मटकी घालून व्यवस्थित परतून घ्या 

आता आपण मिसळ ची प्लेट तयार करूया:

प्रथम एका प्लेटमध्ये सुकी मटकी घाला वरून कापलेला कांदा  फरसाण नंतर तर्री घाला नंतर वरून चिरलेला कांदा चिरलेली कोथिंबीर घाला बाजूला त्यासोबत खाण्यासाठी कांदा लिंबू, पाव ,दही ठेवा याप्रकारे गरमागरम मिसळ तयार आहे मिसळपावचा आनंद घ्या



Comments