धपाटे हा पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. महाराष्ट्रात हा पदार्थ अनेक लोकांचा आवडीचा पदार्थ आहे आणि तो आवडीने खाल्ला जातो हा पदार्थ महाराष्ट्रातील स्वयंपाक घरांमध्ये वारंवार बनवला जाणारा पदार्थ आहे . हा पदार्थ बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि आपण खूप कमी वेळामध्ये आणि घरच्या मोजक्या साहित्यामध्ये हा पदार्थ बनवू शकतो. धपाटे खमंग आणि खुसखुशीत होण्यासाठी मी आज तुम्हाला योग्य प्रमाण सांगणार आहे तसे तुम्ही बनवले तर धपाटे खमंग आणि खुसखुशीत होतील चला तर मग आपण धपाटे कसे बनवायचे ते पाहूया
![]() |
साहित्य:
गव्हाचे पीठ २ कप
बेसन ३/४ कप
ज्वारीचे पीठ १ कप
लसुण २५-३० पाकळ्या
हिरव्या मिरच्या ८-१०
हळद १/२ चमचा
मीठ चवीनुसार
कोथिंबीर १ कप
जिरेपूड १ चमचा
ओवा १ चमचा
पांढरे तीळ २ चमचा चमचे
तेल २-३ चमचे
कृती:
प्रथम धपाटे बनवण्यासाठी ज्वारी, बेसन आणि गव्हाचे पीठ एकत्र करून त्यामध्ये हळद, मीठ, तीळ ,ओवा, जिरेपूड, कोथिंबीर, २-३चमचे तेल ,हिरव्या मिरच्या आणि लसूण यांचे वाटण घालून मिक्स करून घ्या
नंतर त्यात थोडे थोडे पाणी घालून चांगले मळून घ्या व ४-५ मिनिटांसाठी तसेच ठेवून नंतर धपाटे बनवायला घ्या
धपाटे बनवण्याआधी गॅसवर मध्यम आचेवर तवा तापण्यासाठी ठेवा
धपाटे थापण्यासाठी एक पोळपाट घ्या
पोळपाटावर कॉटनचे कापड ओले करून ठेवा
त्यावर आपण मळून घेतलेल्या पिठाचा एक गोळा घेऊन कापडावर धपाटे थापून घ्या
गॅसवर ठेवलेल्या गरम झालेल्या तव्याला तेल लावून त्यावर धपाटे टाकून मध्यम आचेवर भाजून घ्या व त्याचप्रकारे दुसऱ्या बाजूने तेल टाकून भाजून घ्यावे
अशाप्रकारे गरमागरम धपाटे दह्यासोबत किंवा मुगाच्या चवळीच्या उसळी सोबत खाण्यासाठी तयार आहेत

Comments
Post a Comment