उन्हाळा म्हटले की आईस्क्रीम, कुल्फी, मठ्ठा, ताक, लस्सी असे पदार्थ आपोआप प्यावेसे वाटतात. उन्हाळा आहे आणि काही थंड खावसं वाटतं ? बनवा अगदी घरच्या घरी ठेल्यावर मिळते तशी मटका कुल्फी इथे कुल्फी बनवताना मी काही खास गोष्टी सांगितल्या आहेत, त्या जर तुम्ही लक्षात घेतल्या तर कुल्फी अगदी ठेवल्यावर मिळते तशी रवाळ , दाणेदार आणि तशाच चवीची होईल
साहित्य :
. म्हशीचे दूध १.५ लिटर
. साखर पाऊण कप
. दूध पूड (मिल्क पावडर) पाच मोठे चमचे
. बदाम पिस्ता काजू पूड तीन मोठे चमचे
. केशर १०-१२ काड्या
कृती:
कुल्फी बनवताना जाड तळाची कढई किंवा पॅन घ्यावा व त्यात म्हशीचे दीड लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवावे दूध उकळले की गॅस मंद करून दूधात केशर घालावे
दुसऱ्या गॅस वर एक पॅन गरम होण्यासाठी ठेवावा गरम झालेल्या पॅन ला ब्रश ने तूप लावुन घ्यावे नंतर त्यावर साखर घालावी (शक्यतो साखर दुधातच टाकली जाते पण कुल्फी ला तांबूस कलर येण्यासाठी साखर हलकीच कॅरमलाईज करून घ्यावी ) साखर विरघळली की त्यात दोन चमचे पाणी घालायचे म्हणजे कुल्फी ला रवाळ पणा येतो तयार झालेले साखरेचे कॅरमल उकळत ठेवलेल्या दुधात थोडे थोडे घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यावे
एका वाटीत दूध पावडर घेऊन त्यात उकळलेले दूध घालून त्याची पेस्ट करून घ्यावी व ती पेस्ट गॅसवर उकळत ठेवलेल्या दुधात थोडी थोडी घालून मिक्स करावी नंतर त्यात बदाम पिस्ता काजू ची पूड घालून दूध मंद आचेवर ठेवावे दूधाला दाटसरपणा येईर्यंत दूधाची बाजूची साय मोडत ढवळत राहावे दुधाला दाटसरपणा यायला २०-२५ मिनिटं लागतात दूध दाटसर झाल की थंड होण्यासाठी ठेवावे संपूर्ण थंड झाल्यावर कुल्फी चे मिश्रण कुल्फी मोल्ड मधे ओतून कुल्फी १२-१३तासांसाठी डीप फ्रिझर मधे तयार होण्यासाठी ठेवावी
१२तासानंतर कुल्फी खाण्यासाठी तयार होते
.jpeg)
Khup chaaan ek number
ReplyDeleteThank you
ReplyDelete