नमस्कार मैत्रिणींनो तुमचं माझ्या श्रद्धाज किचन या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे हा माझा पहिला ब्लॉग आहे ह्या ब्लॉगमधून मी तुम्हाला नवनवीन रेसिपीज सोप्या पद्धतीने कशा बनवता येतील हे सांगणार आहे
नमस्कार मैत्रिणींनो पायनॅपल केक करण्यासाठी लागणारे साहित्य कृती सर्व काही तुम्हाला मी सांगत आहे
साहित्य:
१ व्हॅनिला पेस्ट्री पावडर 250ग्रॅम
२ पाणी 140मिली
३ तेल 40मिली
४ व्हीप क्रीम
५ पायनॅपल क्रश
६ पायनॅपल इसेन्स
७ चेरी
कृती :
प्रथम आपण पायनॅपल चा बेस बनवून घेऊया पायनॅपल चा बेस बनवण्यासाठी 250 ग्रॅम पेस्ट्री पावडर मध्ये 140 मिली पाणी, 40 मिली तेल आणि एक चमचा इसेन्स घालून ते मिक्स करून त्याचे मिश्रण तयार करून बस एका डस्टिंग केलेल्या केक टिन मध्ये ओतून शिजवून घ्यावे 45 ते 50 मिनिटात शिजून बेस तयार होतो केक शिजल्यानंतर लगेच काढू नये केक थंड होण्यासाठी ठेवून द्यावा केक थंड होईपर्यंत व्हीप क्रीम बनवून घ्या
क्रीम तयार झाल्यानंतर थंड झालेल्या बेस चे आडवे तीन भाग करून त्यावर शुगर सिरप (साखरेचे पाणी) लावावे व नंतर त्यावर पायनॅपल क्रश आवडीप्रमाणे पायनापल चे छोटे छोटे तुकडे ठेवावेत क्रीम मध्ये पायनॅपल इसेन्स घालून क्रीम तीन भागांवर लावून एकावर एक तीन भाग ठेवावेत व नंतर पूर्ण केक व्हीप क्रीम ने कव्हर करावा नंतर आपल्या आवडीप्रमाणे केक हवा तसा सजवावा केक सजवून झाल्यानंतर एका तासासाठी फ्रिझर मध्ये ठेवावा व नंतर फ्रिझमध्ये ठेवावा अशा पद्धतीने पायनॅपल केक तयार होतो



👌👌
ReplyDeleteThank you
Delete