कधी कधी स्वयंपाकाचा कंटाळा येतो तुम्हाला बाहेर जायची घाई आहे काहीतरी झटपट किंवा चमचमीत करायच आहे तर आपण आज झटपट अंडा बिर्याणी कशी करायची ते बघूया अजिबात पसारा न मांडता झटपट होते आणि इथे मी परफेक्ट प्रमाण दिले आहे त्यामुळे भात मोकळा मोकळा होतो अगदी दम बिर्याणी सारखा
साहित्य:
उकडलेले अंडी ८
तांदूळ १.५ कप
पातळ चिरलेला कांदा ४
टोमॅटो २
तमालपत्र २
दालचिनी १
वेलची २
चक्र फुल २
लवंग ४-५
जिरे २ चमचे
मसाला वेलची १
काळी मिरी ७-८
आलं लसूण पेस्ट २ चमचे
पुदिना १०-१३
हिरवी मिरची ३
तेल ५-६ चमचे
दही ४ चमचे
कोथिंबीर २ चमचे
हळद १/२ चमचा
मिरची पावडर १ चमचा
बिर्याणी मसाला २ चमचे
गरम मसाला १/२ चमचा
साजूक तूप २ चमचे
पाणी २ कप
मीठ चवीनुसार
कृती:
प्रथम एका कुकरमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवावे तेल कडकडीत गरम झाल्यावर स्लाईस करून घेतलेले २ मध्यम आकाराचे कांदे तळून घ्यावे त्यानंतर अंड्यांना चिर पाडून त्यावर हळद , लाल तिखट आणि मीठ टाकून अंडी तेलात फ्राय करून घ्यावेत
त्यानंतर उरलेल्या तेलात जिरे, लवंग ,काळी मिरी ,वेलची, मसाला वेलची ,तमालपत्र ,चक्रफुल ,दालचिनी हे सर्व खडे मसाले टाकून नंतर त्यात स्लाईस करून घेतलेले दोन मध्यम आकाराचे कांदे टाका
कांदा परतल्यानंतर त्यात आलं लसूण पेस्ट २ चमचे व कापून घेतलेले २ मध्यम आकाराचे टोमॅटो टाकून परतावे
नंतर त्यात दही, मधून कट केलेली हिरवी मिरची, पुदिन्याची दहा-बारा पाने ,बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद ,मिरची पावडर, गरम मसाला हे सर्व पावडर मसाले टाकून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे
त्यानंतर त्यात दोन कप पाणी ओतून उकळण्यासाठी ठेवावे नंतर त्यात बिर्याणी मसाला व चवीनुसार मीठ घाला पाणी उकळेपर्यंत आपण तांदूळ धुऊन घेऊया
तांदूळ स्वच्छ धुऊन २० मिनिटांसाठी पाण्यात भिजत ठेवावा व नंतर पाणी काढून टाकावे
कुकर मधल्या पाण्याला उकळी आल्यानंतर त्यावर तळलेला कांदा घाला नंतर त्यात तांदूळ घाला तांदूळ घातल्यानंतर त्यावर अंडी नंतर वरती तळलेला कांदा कोथिंबीर घाला वरून थोडा बिर्याणी मसाला साजूक तूप घाला नंतर कुकरला झाकण लावून मोठ्या गॅसवर १ शिट्टी काढून घ्या व बारीक गॅस करून ५ मिनिटे तसेच ठेवा पाच मिनिटानंतर गॅस बंद करून कुकरची वाफ जाऊ द्या कुकरची वाफ गेल्यानंतर गरमागरम अंडा बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे

Tq
ReplyDelete